आतंकवाद की दहशतवाद ?
आजकाल अनेक मराठी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे तसेच अनेक मराठी भाषिक सुद्धा आतंकवाद किंवा आतंकवादी असा चुकीचा शब्द प्रयोग करतात.
मराठीत आतंक हा शब्दच अस्तित्वात नाही तर त्यापासून निर्माण झालेले शब्द कसे येऊ शकतील ?
जर आपली भाषा एखादी गोष्ट वर्णन करण्यास तोकडी पडत असेल, तर दुसरया भाषेतील शब्द जरुर घ्यावेत, पण दहशतवाद हा योग्य शब्द असताना उगाचच हिंदीचे पाय का चाटावेत ?
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही !!
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही !!
हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून
बोलता बोलता शब्द ओठी जतीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतयं, बाकी काही नाही
मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही !!
हसायच्या आधी मला
जरा सराव करावा लागतो,
मनावरचा घाव बराच
दाबून धरावा लागतो ..............
'प्रेमात पडतांना' -पवन शिंदे
'प्रेमात पडतांना'
-पवन शिंद
तिच्या प्रेमात पडतांना
तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
तोंड दुखेपर्यंत बडबडलो
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं.
तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
तिच्या नजरेला नजर भिडवतांना
तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.
तिच्या हाताचा, ओठणीचा,
स्पर्श हवाहवासा वाटतो
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
हा विषय काढायचं राहूनच गेलं.
हसत राहीलो, हसवत राहिलो
तिला दरवेळी, दर भेटीला.
तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं.
ती आली की वेळही
उडून जायचा मला न समजता.
पण,
त्या दिवशी ती आली आणि निघाली
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं...
लग्नाआधीचे 'तो' आणि 'ती' लग्नानंतरही तेच असतात
लग्नाआधीचे 'तो' आणि 'ती' लग्नानंतरही तेच असतात, पण लग्नानंतर त्यांच्यातला संवाद बदलतो... कसा?... असा...
लग्नापूवीर्...
तो : हुश्श! किती वाट पाहात होतो मी या क्षणाची.
ती : मी जाऊ का निघून?
तो : छे गं! तसा विचारसुद्धा मनात आणू नकोस.
ती : तुझं प्रेम आहे माझ्यावर?
तो : अर्थातच!
ती : तू कधी माझी फसवणूक तर नाहीस ना केलेली?
तो : नो, नेव्हर! असा विचार तरी तुझ्या मनात कसा येतो?
ती : तू माझं चुंबन घेशील?
तो : हो तर.
ती : तू मला मारहाण करशील?
तो : अजिबात नाही. मी त्या प्रकारचा पुरुष नाही.
ती : मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का?
तो : हो.
लग्नानंतर...
लग्नानंतर काय होते हे जाणून घेण्यासाठी नवा संवाद लिहिण्याची गरज नाही... फक्त हाच संवाद खालून वर वाचत जा!
माझ्यातला मी
माझ्यातला मी
- भावना दामले
आपण आपले आपल्यालाच शोधत असतो.
प्रत्येक क्रियेतून, प्रत्येक प्रतिक्रियेतून
स्वत:ला शोधताना ठेचाळत जातो
जखमी होत जातो
तरीपण शोधत जातो
पूर्ण जीवनच एक शोध असतो
स्वत:ला ओळखायला
आपण मनाचा कानाकोपर्याचा शोध घेत असतो
आपण शोधत असतो
माझातला मी
कधी भेटतो कधी भेटत नाही
आणि भेटला तरी ओळख होत नाही
कधी आपणच भेटायचे टाळतो
नवीन - नवीन क्लृप्ती शोधून
हूलकावणी देत असतो
कारण माझ्यातला मी
नेहमी स्पष्ट व सत्यच सांगतो
आणि ते अप्रिय सत्य आवडत नाही.
पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.
होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.
झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.
आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर
पहिली भेट.......
पहिल्या भेटीत.......
एकमेकांची नजर चुकवुन
एकमेकांना पहायच असत
स्वतः माञ साळसुदपणे
चेहरयाआड लपायच असत
पहिल्या भेटीत.......
अगदी सावधपणे वागायच असत,
हसतांही चेहेरयावरच
खोट गांभिय जपायच असत
पहिल्या भेटीत.......
एकमेकांना समजायाच असत
निदान जे समजलं नाही
तेच कळलय अस दाखवायच असत
पहिल्या भेटीत.......
अनेक शंकांच ओझ वहायच असत
त्याच्या सोबत आपनही स्वःताला
अपेक्षांच्या तराजुत तोलायच असत!
पहिल्या भेटीत.......
मनातुन खुप काही बोलायच असत
नेमक अशाचवेळी ओठांनी
जिभेवरल्या शब्दांना आवरायच असत
पहिल्या भेटीत.......
सतत घड्याळ निरखायच असत
एकमेकांच्या काट्यांमध्ये
इतक्या लवकर गुंतायच नसत
एकदा तरी मला तुला,
मनापासुन हसवायचंय,
दोन क्षण का असेनात्या निखळ हास्यात,
स्वतःला हरवायचंय...
फक्त एकदाच मला तुझ्या डोळ्यांत,
नजरेला नजर मिळवत बघायचंय,
डोळ्यांमागचं वादळ मला,
अनाहुतपणे अनुभवायचंय...
फक्त एकदातरी मला,
तुला प्रेमाने जवळ घ्यायचंय,
नाहीस जगात ह्या तु एकटी,
हेच तुला समजवायचंय...
फक्त एकदा तरी तुला,
माझ्यासाठी बेचैन होताना पाहायचंय,
त्यासाठी मला तुझ्याशी,
एकदा खोटं खोटंच भांडायचय...
मग मला तुझ्यासाठी,
एकदाच विदुषक व्हायचंय,
तुझा तो लटका राग मला,
चुटकीसरशी पळवायचंय...
तुझा हात मात्र मला,
आयुष्यभरासाठीच पकडायचाय,
प्रेम करतो किती तुझ्यावर,
हेच तुला सांगायचय...
नेहमीच तुमचाच
do you lovє мє
नाजूक क्षण..........
_________________
पुन्हा आठवन आली आज
त्याच नाजूक क्षणांची
काही वेळ तरी होती सोबत
त्याच्या आपले पाणाची
खांद्यावरती डोके ठेवून
दुख आपले सांगण्याची
एकमेकांचे हात धरूण
प्रित फुलांना जपण्याची
समुद्राच्या लाटानसारख
उंच उंच उडण्याची
क्षिटिजातील त्या शून्याकडे
एकटक बघण्याची
दोघांनी मिळून बघितलेल्या
सुंदर सुंदर स्वप्नांची
पुन्हा आठवण झाली आज
त्याच नाजूक क्षणाची
मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या
मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी
वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी
.
हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख
मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख
.
आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी
मनातील वादळांना मनातच थोपवणारी
.
भासते कधी आकाशातील चांदणीसारखी
तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी
.
तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर
तरीही अंतःरात रुतलेली खोलवर
.
तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे
हरलेi जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे
$#% आई @$#%
आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे
जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी........
तुम्ही जीवनात पहिले स्थान प्रेमाला देणार की
________________________________
तुम्ही जीवनात पहिले स्थान प्रेमाला देणार की मैत्रिला
तुम्हाला काय वाटते
आपापली मते द्यावी.,.,.????
मैत्रीला..... प्रेमाला
पण मला हे स्पष्ट करा की प्रेम आणि मैत्री ह्यात फरक काय ?.. म्हणजे तुम्ही नक्की प्रेमाचा कोणता अर्थ घेता .. मुलाच मुलीवर किंवा मग मुलीच मुलावर असणार ?? फ़क्त हेच प्रेम असू शकत का ?? की तुमच्या मैत्री मधे प्रेम नसत/नाही ..!!!!
आयुष्य
हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....
कधी ते मजेत चालत असत
कधी मजेची सजा बनुन जात
हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....
कोणी रात्री चन्द्र पाहून झोपतो
सकाळचा सूर्य पाहायला मात्र नसतो
हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....
घरचे आवरुन कामावर निघुन जातो
परतीचा रस्ता तो कसा काय चुकतो?
हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....
नवपालवी फ़ुटताना दुष्ट भ्रमर येतो
एका क्षणात सर्वस्वी नाश करुन जातो
हे आयुष्य अस का असत?
आज असत तर उद्या नसत....
फ़ुल कितीही गुणी अन सुन्दर असल
तरी फ़ान्दीवरुन त्याला उतरावच लगत
अन माणसाच्या मनात नसताना
या जगातून जावच लागत
हे आयुष्य असच असत?
आज असत तर उद्या नसत....
तुमचा लाडका ...
रस्त्यावरच्या वळणावर
तुज़े मागे वळून पहाणे ,
अन त्याच एका क्षणासाठी
माज़े दिवसभर वाट पहाणे ,
कुणी म्हणेल प्रेम याला
कुणी नुसतेच पहाणे ,
पण त्याच एका क्षणात होते
माज़े युगानुयूगे जगणे .
पावसात एकटा भिजताना
अचानक तुज़े दिसणे ,
अन तुज़या च्तरित चलताना
ते निम्मे निम्मे भीजणे ,
कुणी म्हणेल प्रेम याला
कुणी नुसतेच भीजणे ,
पण त्याच एका क्षणात होते
माज़े युगानुयूगे जगणे .
बोलता बोलता तुज़े
माधेच गप्प राहणे ,
अन तुज़या बोलक्या डोळ्याणकडे
फक्त पाहत राहणे ,
कुणी म्हणेल प्रेम याला
कुणी नुसतेच पहाणे ,
पण त्याच एका क्षणात होते
माज़े युगानुयूगे जगणे .
तुला एक नजर पाहण्यासाठी
गर्दीत शोधत राहणे ,
अन तू समोर नसताना
तुला डोळे मिटून पहाणे,
कुणी म्हणेल प्रेम याला
कुणी नुसतेच पहाणे ,
पण त्याच एका क्षणात होते
माज़े युगानुयूगे जगणे .
-रस्त्यावरच्या वळणावर
तुज़े मागे वळून पहाणे ,
अन त्याच एका क्षणासाठी
माज़े दिवसभर वाट पहाणे ,
कुणी म्हणेल प्रेम याला
कुणी नुसतेच पहाणे ,
पण त्याच एका क्षणात होते
माज़े युगानुयूगे जगणे .
पावसात एकटा भिजताना
अचानक तुज़े दिसणे ,
अन तुज़या च्तरित चलताना
ते निम्मे निम्मे भीजणे ,
कुणी म्हणेल प्रेम याला
कुणी नुसतेच भीजणे ,
पण त्याच एका क्षणात होते
माज़े युगानुयूगे जगणे .
बोलता बोलता तुज़े
माधेच गप्प राहणे ,
अन तुज़या बोलक्या डोळ्याणकडे
फक्त पाहत राहणे ,
कुणी म्हणेल प्रेम याला
कुणी नुसतेच पहाणे ,
पण त्याच एका क्षणात होते
माज़े युगानुयूगे जगणे .
तुला एक नजर पाहण्यासाठी
गर्दीत शोधत राहणे ,
अन तू समोर नसताना
तुला डोळे मिटून पहाणे,
कुणी म्हणेल प्रेम याला
कुणी नुसतेच पहाणे ,
पण त्याच एका क्षणात होते
माज़े युगानुयूगे जगणे .
- तुमचा लाडका ...-मंगेश
कधी तू असा अबोल की..
वाटते,शब्द द्यावेत तुला उधार,
की,शब्दांचे वादळ तर नसते तुझ्या मनात ?
कधी तू असा बोलका की..
वाटते,तुझ्या शब्दांत वाहून जाईल मी,
की,रित्या शब्दांचे तुझे गुपित मला समजत नाही ?
कधी तू असा शांत की..
वाटते,तुझ्या ह्रदयात विरघळावे मी,
की,वादळापूर्वीची ही शांतता तर नाही ?
कधी तू असा अशांत की..
वाटते,चंदन व्हावे मी तुझ्यासाठी,
की,आगीशी संग मी करत तर नाही ?
कधी तू इतका जवळ की..
वाटते,तुझ्या श्वासांचीही चाहुल घेतेय मी,
की,मला तुझ्यावर विश्वास नाही ?
कधी तू इतका दूर की..
वाटते,तुझ्याशिवाय दुनिया माझी रिती,
की,आपल्यातले अंतर मी मोजलेच नाही ?
कधी तू असा..कधी तू तसा..
वाटतो तरीही, मला हवाहवासा,
की,'प्रेमा'च्याच 'प्रेमा'त आहे मी ?
पण तरीही,'तू' मला हवाहवासा..हवाहवासा..
कॉलेज लाइफ़ "
कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !
कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !
बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !
परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !
पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.
अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!
पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!
प्रेम
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं
शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही
आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात
संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तऱ्हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात
प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं
मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लाग
मला उमगलेली मैत्री
मला उमगलेली मैत्री
मैत्री....
एक बिंदु आणि अनेक मिळालेले सेतु
पार पाडावा अगदी जणु सराव रोजचा
मैत्री....
एक बगीचा मनात सदैव फ़ुलणारा
माळी होऊन घ्यावी जीवापाड काळजी
मैत्री....
एक धागा सरळ रेशमी मऊसुत जसा
जास्त ताणला तर तुटतो बघा ना कसा
मैत्री....
एक रोपटे अबोलीचे प्रत्येकाच्या दारातले
फ़ुले मुक हसती पाणी पिताना ओन्जळीतले
मैत्री....
एक सुगन्धी दरवळणारे लिहलेले पत्र
खुशालीसाठी उशीराही का होईना नाही पाठवावे मात्र
मैत्री....
एक नात कसल्याही मोहात न अड्कणारे
निरागसता जपताना खळखळुन हसवणारे
मैत्री....
एक आनंदाचे झाड हक्काच्या अंगणातले उभे
ऊन वारा सारे झेलुनही कधीही न वाकणारे
मैत्री....
एक अनमोल शिंपला अवचित हाती मिळालेला
घाई नको उघडाया अलग़द उघडा लख्ख प्रकाश देणारा 'मोती'आला का हाती?
आज वेळ नाही....
अमाप सुख आहे सगळ्यान्च्याच
पदरात पण ते अनुभवयला
आज वेळ नाही.....
आईच्या अंगाईची जाणिव आहे
पण आईला आज
'आई' म्हणायलाच वेळ नाही.....
सगळी नाती संपवुन झालीत
पण आज त्या नात्यांना पुरायलाही आज वेळ नाही.....
सगळ्यान्ची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत
पण प्रेमाचे चार शब्द
बोलायलाही आज वेळ नाही.....
ज्या पोराबाळान्साठी मेहनत दिवस-रात्र करतात
त्यांच्याकडे क्षणभर
बघायलाही आज वेळ नाही....
सांगेल कोण कशाला दुस-याबद्द्ल
जेव्हा ईथे स्वतःकडेच
बघायला वेळ नाही......
डोळ्यावर आलीये खुप झोप
पण आज कोणाकडे
झोपयलाही वेळ नाही.....
ह्रुदयात वेदनांचा पुर वाहतोय
पण त्या आठवुन
रडायलाही वेळ नाही....
परक्यांची जाणिव कशी असेल
जर ईथे आपल्याच माणसासाठी वेळ नाही...
आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या
या संघर्षात जरा माग वळुन
पहायलाही वेळ नाही........
अरे जीवना तुच सांग
जगण्यासाठीच चाललेल्या या धावपळीत
जगायलाच आज वेळ का नाही?
---- वाचनात आलेली एक सुंदर कविता
ति मि आणी बस........
वरळीला जाण्यासठी मि मुम्ब्ई सेन्ट्रलच्या बसमध्ये चढलो,
दुपारची वेळ, बस थोडीफार रिकामी, म्हणून खीडकीजवळ बसलो,
बस पुढे निघाली आणी प्रभादेवीजवळ थाम्बली,
त्या BUS-STOP वर एकच् गोड मुलगी अणी ति बस मध्ये चढली,
मी तीच्याकडे एकटक बघीतले, ति जवळ आली
EXCUSE ME! म्हणून माझ्याजवळ बसली,
शहारुन गेलो मि, बसताना झालेल्या तिच्या स्पर्शाने,
फ़िदा झालो तिच्यावर, तिच्या स्मित अश्या हर्षाने,
वाटले तिच्याशी बोलावे, म्हणून HI, HOW ARE YOU..?
असे मनातच पुटपूटलो,
पण तिच्याशी बोलण्याची हिम्मतच् झाली नाही म्हणून गुपचूपच बसलो,
बराच् वेळ मला तिचा सहवास लाभला, पण व्हायचे तेच झाले,
तिचे STOP आले, आणी तिला बस मधून उतरताना पाहून मन मझे कासाविस झाले.
पण मीत्रानो मि हताश झालो नाही, पुढे जाण्यासठी बस रस्त्यावरुन वळ्ली,
आणी पुढच्या BUS-STOP वर पुन्हा एक गोड मुलगी चढली....
ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं पाणी
क्षणभर बसला, भेसूर हसला
बोलला वरती पाहून
मुंबईमधून आत्ताच आलो
आलो बॉम्ब लावून
माज चढल्या सैतानासारखा
लोकल्स मधून नाचलो
साथी सारे पकडले जातील
मीच एकटा वाचलो
वाटलं होतं बॉम्ब लावून
मुंबईची वाट लागली
मुंबईमात्र नेहमी सारखीच
पुन्हा धावायला लागली
खिशाकडे हात जाताच
वर बघून म्हटला
पैसे नकोत सरदार
मनात भकासपणा दाटला
मुंबईकरांचं धैर्य पाहून
मोडलाय माझा कणा
छातीवरती बंदुक ठेवून
फक्त मर म्हणा!
हरवलंय सारं, जे अनुभवलं होतं कधी..
आता आहेत केवळ आठवणीं,
काही कडू काही गोड ...
आठवतात अजून ते
आजीच्या हातचे दहिपोहे,
घुमतात आजुनही कानात
देवघरातले आजोबांचे दोहे ...
दरवळतो आहे अजून हवेत
बागेतल्या त्या पहिल्या मोगîयाचा सुगंध,
पावसात चींब भिजलेल्या धरेचा
तो सुखावणारा परिमल मंद ...
आंबले आहेत दात अजून
त्या हिरव्याकंच कैरिने,
भिजून शहारलंय मन आतुर
श्रावणातल्या त्या पहिल्या सरीने ...
कुठे गेल्या त्या संध्याकाळच्या
शुभंकरोति अन रामरक्षा,
हरवला का तो वासुदेव
अन त्याला दिलेली भिक्षा ...
पण खात्री आहे मला
सापडतील सगळ्या गोष्टी हरवलेल्या ...
तो आजीचा हस्तस्पर्श, ते दहिपोहे, देवघरातले दोहे, त्या टवटवीत मोगîयाचा गंध ...
परत घेवून जाईल मला तोच दरवळणारा मॄदगंध
माझ्या हरवलेल्या घराच्या दिशेने ....
समाज सेवा
समाज सेवा ही समाज सेवा,
होते फक्त घेवून मेवा.
कोणाला ह्याच अर्थ कळेना,
कोणी सत्याच्या मार्गाला वळेना.
गाँधी, जवाहरलाल सारखे नेता सत्याच्या मार्गानी जहाले थोर ,
आजचे नेता पैसे खाउन झालेत चोर.
संगा हीच कई समाज सेवा,
ह्या जगत कोणीच बार नहीं का देवा.
आशा
-सौ. माधुरी अशिरगडे
आशेच्या आघाशी, उपाशी पक्ष्यांना
हे स्वप्नदाणे कुठवर घालायचे
आता त्याच्याही साठ्याला
केविलवाणी ओहोटी
लागली होती
इकडे या पिलांना नवनवीन
आशेची पालवी फुटतच होती
मला फक्त दिसत होती
त्यांची खालावत जाणारी प्रकृती
एक पराभूत खंत
मनात दिसामासाने अंकुरत होती
श्रद्धा वाहून गेलेली व
चैतन्य आटलेली
आशा निराश होत होती.......
जगताना गठीला आलेले
कडू अनुभव
लिम्बच्या पानासारखे
स्वीकारतात
भालेपनाचा गोडवा
ओठावर ठेवावा
असा पाडवा
समजुदर असावा
अश्या समंजस नववर्षाचे
मन:पूर्वक स्वागत!
♥ एक वर्षभर माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल
आभार तुझे मानतो आहे
तुझ्या नंतर मी आता
दुसरी मुलगी शोधतो आहे
तु सुद्धा आता
दुसरा कुनी शोधला असशील
रोज रोज त्याला
माझ्यासारखा पिळला असशील
तुला माहीत आहे
प्रेमासाठी किती STRUGGLE करावा लागतो
एका मुलीला पटवायला
किती घाम गाळावा लागतो
तुला लिहीलेल्या प्रेमपत्रांची
आजही आठवन ताजी आहे
पुढचे प्रेम करायला
मला त्यांची गरज आहे
आपल्या प्रेमापायी तुला दिलेले
सर्व GIFT सुद्धा हवे आहे
अर्ध्या किंमतीत सुद्धा त्यांना
विकत घ्यायला मी तयार आहे
तुझ्यावर केलेला सर्व खर्च
आजही माझ्याकडे तयार आहे
CHECK घ्यायचा की CASH घ्यायची
यावर विचार सुरु आहे
अरे हो...
तुझा तर माझ्यावर
कोनताही खर्च नसेल
कारन पर्स नेहमी घरी विसरने
तुझे आजही सुटले नसेल
तुझ्याकडे मी दिलेला
माझा फोटो मला हवा आहे
मुलींना IMPRESS करायला
तोच तर एक दुवा आहे
तुझ्याकडुन मिळालेल्या सर्वच वस्तुंचा
माझ्या पुढच्या प्रेमावर मी वर्षाव करील
तुला जसे PROPOSE केले होते
तसेच मी तिला पन करील
काय माहीत कशी असेल ती !
काय माहीत कशी असेल ती !
सुंदर नाजूक उठून दिसेल ती,
गालावर सुरेख खळ पडून ह सेल ती,
कारण नसताना खोटी च रुसेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
एकुलती एक सर्वात थोरली असेल ती,
नाहीतर कदाचित धाकटि असेल ती,
संसार कसा संभाळेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती,
परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
थोडी नखरेल असेल का ती,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती,
एक संमज्स अर्धांगिनी शोभेल का ती,
काय माहीत कशी असेल ती !
एवढ छोट आयुष्य सहज जागेल का ती,
आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती,
दुखात ही न तुटता हसेल का ती,
काय माहीत काही असेल ती !!!!!!
कुठवर जिवना तू मला, असं फरफटत नेशील - एक गजलं
कुठवर जिवना तू मला, असं फरफटत नेशील
निखाऱ्यां वरून कापसाला, असं खरचटत नेशील
नाही ईच्छा पावलांची, मखमलावर चालण्याची
मृत्यू तूही का मला, असचं बरबटत नेशील
आलो कोरड्या दूनियेत, मी माझेचं अश्रूं पुसाया
कोणा एकाच्या तरी, आठवणीत जगवत नेशील
खाली रुतलो चिखलात, वर फेकून दे नर्कात
स्वर्ग कसा असतो, तो तरी दाखवत नेशील
कधी मागितला तुझ्याकडे, सहा मिटर कापड
खिशातून काढून रुमाल, चेहरा झाकत नेशील
डिवसलं वेदनांनी सदा, जगलो तोवर
जाताना तरी त्याचा, डोळा चुकवत नेशील
चंदनाच्या लाकडासवे, जळण्याची नाही मनिषा
अग्नीची सोय करून, धर्माने सजवत नेशील
हजारो सजीवां मधून, एका निर्जीवाने का जावं
चार खांद्याच्या तरी, पालकीतून गाजवत नेशील
वस्त्र माझे धुतलं, डाग जे त्यांचे होते
माझ्या चरीत्र्यावरचे डाग, पुसत नेशील
का असंख्य डोळ्यातून, मी थेंब थेंब गळावं
तीच्या दोनच अश्रूंत, मला भिजवत नेशील
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment