Monday, August 3, 2009

काय माहीत कशी असेल ती !
काय माहीत कशी असेल ती !

सुंदर नाजूक उठून दिसेल ती,
गालावर सुरेख खळ पडून ह सेल ती,
कारण नसताना खोटी च रुसेल ती,
काय माहीत कशी असेल ती !

एकुलती एक सर्वात थोरली असेल ती,
नाहीतर कदाचित धाकटि असेल ती,
संसार कसा संभाळेल ती,
काय माहीत कशी असेल ती !

फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती,
परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती,
काय माहीत कशी असेल ती !

थोडी नखरेल असेल का ती,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती,
एक संमज्स अर्धांगिनी शोभेल का ती,
काय माहीत कशी असेल ती !

एवढ छोट आयुष्य सहज जागेल का ती,
आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती,
दुखात ही न तुटता हसेल का ती,
काय माहीत काही असेल ती !!!!!!



***एक दिवस असंच.. ***
एक दिवस असंच...
-अमोल कपोले

डोळ्यांनी चांदणं खुडतांना
हळूच हाती लागला
तुझ्या पापणीआडचा चंद्र

मनात मलाच शोधतांना
हलकेच सापडत गेल्या
तुझ्या असण्याच्या खाणाखुणा

पाकळीवरचा दवबिंदू वेचतांना
अलगद अंगी बिलगला
तुझा चिंबलाजरा स्पर्श

दाटलेले भाव कळताना
अलवार कुजबुजलेले
तुझे गुलाबगोड शब्द

आणि

सरतेशेवटी तुझ्या नजरेत
नेमका समजलेला
माझ्या हरवलेपणाचा
ओळखीचा अर्थ !





माझी पहिली कविता
स्वप्नात नेहमी भेटतोस
तसा प्रत्यक्षात भेटशील का?
भरकटलेल्या माझ्या मनाला
आधार तू देशील का?
प्रेमान हातात हात
तू धरशील का?
आनंदाच्या वाटेवरून जाताना
दुखातही साथ देशील का?
खांद्यावर डोक ठेवून
मनसोक्त रडू देशील का?
डोल्यातल पाणी पुसून
मिठीत मला घेशील का?
विस्कटलेले केस सावरून
प्रेमान मला समजावशील का?
आयुष्याच्या खडतर वाटेवर
शेवट पर्यंत साथ देशील का?




handsome mulachi olakh whavi
amha doghanchi mane julavit
bike war mage basun phirwanara
mala hi ek boyfrend milawa

jyachya fakta najarenech man moharun nighave
dolyat jyacha vushwas asawa
hridayat nehami toch asawa
bike war mage basun phiranara
malahi ek boy frend milawa

CCd madhe basun roz coffee piu
mawaltya suryala sakshi dharun premachya shapatha khau
ayushyatari sari dukh jyachya khndyawar doka thevatach galavi
bike war mage basun phiranara
malahi ek boy frend milawa

dwidha man mag madhech mhanel
tyachya manat kay asel
sata janmachi saath ki fakta one night stand
ayushyat kadhihi na dukhawanara
bike war mage basun phiranara
malahi ek boy frend milawa






एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
जिला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
जिला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी तिच्याकडेच पहावे........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने तिच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद तिचा आणि हसू माझे असावे,
तिच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि तिच्याचसाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
जिच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर तिचे आणि शब्द माझे असावे




"पुरवतो मी आज तुझा हट्ट!"
कुणी तुला चंद्र म्हणतं
कुणी तुला फुल म्हणतं
प्रत्येक जण आपापल्यापरीनं
तुझ्या सौंदर्याचं वर्णन करतं
कोणासाठी तु आहेस जलपरी
तर कोणासाठी एक स्वप्नसुंदरी
आज तुझा जुना हट्ट मी पुरा करणारं
तुझ्या सौंदर्याचं वर्णन आज मी ही करणार......
केस तुझे रेशमी इतके
रेशीमही ज्याच्या शोधात भटके...
डोळ्यात तुझ्या मी हरवलो प्रथमदर्शनी
शोधतो आहे आजही स्वतःला.....
ओठांचा तर तुझ्या काय सांगु थाट
माझ्या प्रत्येक भावनेला फुटते तिथेच,
शब्दरुपी वाट......
तेज तुझ्या चेहऱ्यावरले पाहुन
सुर्यालाही लागे स्पर्धेची चाहूल.
जाण न प्रिये तु माझी व्यथा
काय सांगू तुझ्या सौंदर्याची कथा
तेज तुझ्या चेहऱ्यावरले पाहुन
सुर्यालाही लागे स्पर्धेची चाहूल.
जाण न प्रिये तु माझी व्यथा
काय सांगू तुझ्या सौंदर्याची कथा



एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं....!





झाली राखरांगोळी ती जी का माझ्या आयुष्याची,
त्याच राखेतून आता फुल मी बनणार आहे...
दिले दु:ख जे प्राक्तनाने घेइन भोगुन मी सुखाने
सरता सारे संपवुनी मी नवजीवन जगणार आहे.......



***एकच क्षण ***
एकच क्षण
-डॉ. सौ. उषा गटकरी

एकच क्षण असा
हिरकणीसा चमकून जावा
एकच क्षण असा
अंतरी रूतुन बसावा...

एकच क्षण असा
ज्याची वाट पहावी असा
एकच क्षण असा
जीवनाचा अमुल्य ठेवा...

एकच क्षण असा
अवचित उभा ठाकावा
एकच क्षण असा
ज्या सारखा दुजा नसावा...

एकच क्षण असा
वर्णायास शब्द तोकडा
एकच क्षण असा
अनुभवान्ती जीव सुपाएवढा..!




शेवटची भेट...........
शेवटची भेट...........
मला ती आज शेवटच भेटणार होती
दुख:शी भेट माझी आज तिथेच घडणार होती
आजचा दिवस सहज सरत होता
"अरे जरा दमानं" सांगितल तरी ऐकत नव्हता

तिला आज भेटुच नये असे वाटत होतं
मन माझं तिच्या निरोपाच्या
भयाने आतल्याआत तुटत होतं
पण पुन्हा तिचं ते मोहक रुप,
ते गहिरे डोळे मला दिसणार नव्हते
एकदाच शेवटच म्हणत
आज मन तिच्यासाथी हरणार होतं

कधी नव्हे ते आज पोहोचलो मी वेळेवर
नेहमी जिथे बसायचो बसलो
हात टेकवत त्या बाकावर
आज बागेतली गुलाबी फ़ुलं
मला काळी कुळकुळीत दिसत होती
पाखरांचे ते किलबीलणे मला विरह गाणी वाटत होती

अचानक बागेतलं वातावरण शांत झालं
"ही वादळापुर्वीची शांतत रे"!!
जणु मला इशा-याने सांगितल
हळु हळु काळे ढग जमु लागले
माझा हा विरह सोहळा पाहण्यास जणु ते आतुर झाले

तेवढ्यात ती आल्याची चाहुल लागली
तिने मला पाहताच लगबगीने पावलं टाकली
ती जवळ जवळ येत होती आणि पाऊशी सुरु झाला
सोबत त्याच्या विजाही कडाडु लागल्या
"आज तिच्या नजरेला नजर देउनच बोलणार"
मनात मी शपथ घेतली
पण ती समोर येताच माझ्याच
नजरेने माघार घेतली, नजर माझी भेदरली

ती शांत उभी होती
"उशीर का केलास"? मी विचारले
"अरे काम होतं जरासं!!" ती उत्तरली
बरं ठिक आहे म्हणत!! मी मान वळवली

का रे काय झाले ? तिने विचिरले
कुठे काय !! काही नाही ?
म्हणत मी तिच्या त्या प्रश्नाला टाळलं

"अछ्चा माझं लग्न ठरलय तो युएसए ला आहे"! तिने हसत सांगितल

माझं काय? मी झुरत विचारलं
अरे सॉरी घरातले तयार नव्ह्ते
मी तरी काय करु ?? सगळं गणितच चुकले
चल मी निघते म्हणत ती उठु लागली
पाठी न बघताच ती पुढे चालु लागली

नजर माझी तिच्या पाठमो-या
आकृतीकडे फ़क्त पाहत राहीली
हळु ह्ळु तिची ती आकॄती
माझ्या डोळयात फ़क्त भीजत राहीली
सोबत पावसाची सरही वाढु लागली
त्या पावसाच्या पाण्यात माझ्या
स्वप्नांची कागदी नाव बुडु लागली.........






एक तू आणि एक मी

एक क्षण तुझा
एक क्षण माझा
आणि एक सुंदर सहवास आपल्या दोघांचा

एक हसू तुझ
एक हसू माझ
आणि मोत्यांची बरसात आपल्या दोघांच्या हास्याची

एक हाथ तुझा
एक हाथ माझा
आणि एक शेवटपर्यंत निरपेक्ष साथ दोन जीवांची

एक श्वास तुझा
एक श्वास माझा
आणि एकरूप झालेली स्पंदन आपल्या दोन हृदयांची

एक अश्रु तुझा
एक अश्रु माझा
आणि अश्रुंनी भरलेली ओंजल आपल्या दोन हातांची

एक प्रश्न तुझा
एक प्रश्न माझा
आणि उत्तरासाठी थांबलेले आपण दोघहि

एक वाट तुझी
एक वाट माझी
आणि एकत्र प्रवास दोघांचाही

एक आयुष्य तुझ
एक आयुष्य माझ
आणि आनंदाची उधलन दोघांचीही

एक प्रेम तुझ
एक प्रेम माझ
आणि एकमेकांच्या प्रेमात रंगलेले आपण दोघही

तुझी अणि माझी बेरीज केली
तुझी अणि माझी वजाबाकी केली
गुणाकार, भागाकार सुद्धा करून पहिला
आणि शेवटी जे उत्तर आल ते होत
फक्त अणि फक्त आपल
आपल्या दोघांच.....

Bharati Sarmalkar....





प्रत्येकाचा वेगळा धर्म
इथे प्रत्येकाची वेगळी जात,
जगायचाही 'format', इथे मरायचाही 'format'..........!
चंचल मन चंचल स्वाभाव,
कुठे गुलाबाची पाकळी कुठे काट्याचे घाव,
गुलाबी मनाला इजा करते लाल काट्याची 'पात'
जगायचाही 'format', इथे मरायचाही 'format'..........!
वर्चस्वाची चढाओढ़ इथे खुर्चीसाठी वाद,
हिंसेला देतात अहिंसेचा प्रतिसाद,
विजयी होतो थोरला भाऊ, करून धाकट्यावरती 'मात'
जगायचाही 'format', इथे मरायचाही 'format'..........!
कृतीतून विकृति आज ही प्रत्येकाची प्रवृत्ति,
भ्रष्टाचाराची प्रत घेते इमानाची आवृत्ति,
इमानदार झुकतो इथे, बेईमानाची मान 'ताठ',
जगायचाही 'format', इथे मरायचाही 'format',,,,
जगायचाही 'format', इथे मरायचाही 'format'..........!





मला वाटायच तीच माज्यावर जीवापाड प्रेम आहे .
फ़क्त मी विचारायची देरी आहे ..
मलाही ती प्रचड आवडायची
जेव्हा ती मला आपला "best friend" म्हणायची ,
मनातल गुपित फोडायची ,
लाडत येऊन बोलायची ,
लटक रागवायाची ,
माज्याशी भान्डायची ,
गप्पा मारायची ..
माज्या कविता ऐकायाची,
त्याना उत्सुर्फ़ दाद द्यायची ..
माज्यावर प्रेम करायची ..

पण मला माहित नव्हत ती मला
फ़क्त आपला "best friend " मानायची ..


मला खुप यातना जाल्या, जेव्हा ती म्हणाली .
"मी प्रेमात पडले रे त्याच्या...."
पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तेव्हा तिची थट्टा केली .
अन तिची कळी लगेचच खुलवली,
तिला काय सांगू काय नको जालेल.
असे तिला मी कितीदा तरी पहिलेल .
मी म्हणालो, "मज़ा आहे बुवा एका मुलीची.!"
ती म्हणाली," तुला पण मिळेल रे साथ कोणा सुन्दरीची.!"
मन रडत असतानाही रडत होतो.
तिला कलू न देण्याची सगळी काळजी घेत होतो .
तिला पण काहीच कळल नाही .
प्रेमात पडलेल्या तिला वेगळ काहीच दिसत नाही .


मी पण तसदी घेतली नाही मनातल काही बोलायची..
कारण ती मला आपला "best friend" मानायची ..


ती गेल्यावर मी सुन्न जालो ,
आतल्या आत मी मग्न जालो ,
तिच्या आठवणी मी आठवू लागलो .
त्या पुसून टाकायचा निष्फ़ळ प्रयत्न करू लागलो ,
तिच्याशी बोलताना मी तिची खुप थट्टा करायचो .
'त्याच्या' नावाने तिला भरपूर चिडवायचो .
कोणाशी भांडल्यावर मात्र तिला माजी आठवण यायची .
आजही माज्या मध्यस्थीची तिला गरज वाटायची ,
ती अजुन ही माज्याशी खुप बोलायची ,
खुप काही सांगायच म्हणायची ,
पण कधी ते सांगायला विसरायाची..

मनातले अश्रु मी तिला कधीच दिसू दिले नाहीत ,
कारण ती मला तिचा " best friend " मानायची .

मी मात्र आतल्या आत कुढत बसायचो,
माज्याच एकटेपणात हरवलेला असायचो.
तिचे बोलणे ऐकत असताना ,
मुकपणे आपले अश्रु गिळत असायचो
तिच्यासमोर नाटक करणे फारच कठीण होते .
त्याच तीच भांडण ती मला येऊन सांगायची .
माज्याशी बोलून मोकळ वाटल अस म्हणायची.
स्वत:च्या वेदना लपवून तिचे बोलणे..
शांतपणे ऐकून घ्यायचो .
एक दोन गोष्टी सांगून..
तिला बरे वाटावे असे काहीतरी करायचो ..

माज्या बोलन्यापेक्षा माज्या असन्यावरच ती समाधानी असायची ..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची ..






मनातल......
ती एक रम्य संध्याकाल होती....माझ्या कौलारू घराच्या सारवलेल्या अंगणात बसून कातरवेळचा निसर्ग पाहान्यासारखा आनंद माझ्यासाठी दूसरा कोणता असणार? नुकत्याच सुरु झालेल्या वसंत रुतूने बराच बदल घडवून आणला होता....नविन पालवी फुटलेला घरासमोरील पिम्पलाच झाड़ पोपटी पानांनी डवरल होता...आणि त्या गर्द पानांच्या छायेत दडून बसलेल्या कोकिलाचे मधुर कुंजन कान तृप्त करत होते......क्षितिजावर पसरलेला सोनेरी प्रकाश मन मोहून टाकत होता.....इतक्यात आकाशातून जाणार्या एक सफ़ेद रेषेने माझ लक्ष वेधून घेतल...त्या सरल रेषेत थोडीशी हालचाल जाणवत होती....
निरखून पाहिल्यावर कळल की तो एक बगल्यांचा थवा होता.....सरल मागे खेचलेले पाय...आणि सफ़ेद,सोनेरी पंखांची लयीत होणारी हालचाल...!! सगळच कसा शिस्तबद्ध...तालबद्ध...!! जणू काही शुभ्र मोत्यांची माळच आकाशात उड़त आहे.....आपल्या निवासाकडे परतनार्या त्या श्वेत शुकांना पाहून नकळत ओठात शब्द आले.....
"बगल्यांची माळ फुले अजुनी अम्बरात"





'लबाडच, आहेस......!
'लबाडच, आहेस......!
आज नां बरयाच दिवसानंतर 'तिचा" फोन आला,
"हेलो" एवजी, 'कसा आहेस तू..?
म्हणालो,'मजेत...!
माजी आठवन नहीं येत का..?
'नाही" मी, थोडा मिस्किलपने,
नाही sss....? तिचा प्रतिसाद, थोडा रागातच
अग खरच....
बघ ना, आपल्यापासून दूर असणारे आठवतात,
तू तर इथेच असते, माज्या काळजात,.,.,.,'श्वासासारखी"
तू काळजातुन जातच नाही, आणि तुजी आठवनही येत नाही.....
मग तिचा हसरा, लाजरा प्रतिसाद,
'लबाडच, आहेस......!





अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा दिल्लिवर
मराठ्यांचा दावा पाहिजे
हर हर महादेव 'हवा' पाहिजे
'हवा' पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे
म्हनुन" राजे पुन्हा जन्म घ्या"

जय महाराष्ट्र ...!!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------






थेंब थेंब झिरपणारा ओलावा पिंपळवृक्ष बनून उभा राहतो, मी त्याला आई अशी हाक मारतो........
चला सलाम करू धन्य त्या मातेला...
----------------------------------------------
आई हा एक शब्द आहे असं म्हणण व्यर्थ आहे कारण त्यात आहे जे वात्सल्य शब्दात उतरवणं आहे ते अशक्य!!
तरी हा एक प्रयास आहे तिच्याच वाढदिवसाला छोटीशी एक भेट आहे ..
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी.......

मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब आहे
मी अत्तर तर ती त्यातला सुगंध आहे
माझ्या आयुष्याची ती एक चित्रकार आहे
अंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहे
कोणत्याही वादळात तग धरून राहीलेली माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहे
जिच्यामुळे मी, माझी कविता आहे
ती माझी......माझीच फक्त आई आहे.





देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,
डब्बा, वाटरबैग, पाटी अन दप्तर,
कम्पास, लेखन, पेन्सिल अन रब्बर..,,
गावचा फाटा, तिथून शालेची वाट,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

हातभर अंतर ठेउन प्रार्थनेची रांग,
लेझीम चा आवाज, 'झिंक ,'चाक,"झ्यांग",
विश्राम!, सावधान..!, उभा राय ताठ,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

जेवणाच्या सुट्टीत 'वाटना-वाटणी',
भाकरीच्या बदल्यात टमाटयाची चटनी,
जेवाच्या पहिले धुवा लागते हात,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

बे एक बे, बे दुने चार,
गणिताच्या तासात, पोट्याइचा भागाकार,
किती खाल्ला मार, तरी पाढे नाही पाठ,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

चिंचा, बोरं अन पोंगा-पंडित,
बर्फाचा गोला,'गोड लगे थंडित,
संत्र खावुन-खावुन आम्बटलेले दात,,
देवा मले पुन्हा शाळेत नेउन टाक.....!!,

मन लावून अभ्यास करीन,
पहिल्या बाकावर बसून, मास्तरच आइकिन,
पाढे पाठ करीन, रोज करीन गृहपाठ..,,
एकदा, फ़क्त एकदा, देवा शाळेत नेउन टाक,,,
मले शाळेत नेउन टाक,,,, ,,, ,, , . .

No comments:

Post a Comment